पुणेकर अनुभवताय रात्री गारठा, दिवसा चटके

होळी आली, की थंडी पळाली, असा सर्वसामान्य समज असला, तरी पुण्यामध्ये सध्या रात्रीचा गारठा वाढला आहे. दिवसा मात्र नागरिक उन्हाच्या चटक्यांचा अनुभव घेत आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ झाली असली, तरी किमान तापमान अजूनही कमी असल्याने रात्री गारवा जाणवत आहे. रविवारीदेखील पुण्यामध्ये दिवसभरात १५.६ अंश सेल्सिअस आणि ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.


पुण्यात फेब्रुवारीमध्ये उन्हाचे चटके आणि उकाडा अनुभवल्यानंतर, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील तापमानात पुन्हा लक्षणीय बदल नोंदविण्यात येत आहेत. विदर्भामध्ये गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मराठवाड्यामध्ये तापमानात वाढ आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे.